सर्वसाधारण माहिती


सर्वसाधारण माहिती :- गावाचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. त्यामध्ये भात, बांबू, हिरडा इ. पिके प्रामुख्याने घेतली जातात. शेतकरी संख्या १२० स्वयंरोजगार पशुपालन, कुक्कुटपालन ग्रामोद्योग ५० उद्योग गिरणी, सुतारकाम, पेटिंग, केरसुणी, टोपल्या तयार करणे. गाव पातळीवर सर्व साधारण झालेली कामे :- १.पर्यावरण संतुलित ग्राम योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने सन २०१०-२०११ या वर्षात गावात लोकसंख्येइतकी वृक्षलागवड केली. १०० टक्के करवसुली केली. शौचालय बांधकामे १०० टक्के पुर्ण केली. त्यामुळे सदर ग्रामपंचायतीस निर्मलग्राम स्वच्छता अभियानात केंद्रीय पुरस्कार सन २००८-२००९ मध्ये मिळाला. २.सन २०१२-२०१३ या आर्थिक वर्षात इको व्हिलेज अंतर्गत ग्रामपंचायतीने दुसऱ्या वर्षी योजनेत सहभाग घेतला. ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी २ कापडी पिशव्या वाटप केल्या. ३.बायोगॅसचे २ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. ४.१००० वृक्षांची ग्रामपंचायतीने स्वत: लागवड केली. कुटुंबनिहाय प्रत्येकी २ हापूस आंब्यांचे वाटप करण्यात आले. ५.संपूर्ण गावात आतापर्यंत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद फंडातून एकूण ११ सौरदिवे बसवण्यात आले. गावातील प्रत्येक विद्युत खांबावर वीजेची बचत करण्याकरिता सी. एफ. एल. चे दिवे लावण्यात आले. तसेच गावात विविध विकासकामे राबवण्यात आली. ६.सन २००५- २००६ पासून संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चिकणेवस्ती स्टेज बांधकाम, जंगम वस्ती आर. सी. सी. रस्ता, हरिजन वस्ती आर. सी. सी. रस्ता, उंबरमाळ येथे रस्ता. ७.महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात ग्रामपंचायतीने २०११-२०१२ या वर्षात सहभाग घेऊन गावाला रु. १,००, ०००/- बक्षीस प्राप्त झाले. गावातील तंटे समितीमार्फत मिटवून गावात एकोपा वाढला. ८.सध्या भाटघर प्रकल्पग्रस्त निधीतून गावात रस्ते डांबरीकरण, ग्रामपंचायत कार्यालय, बसथांबा, स्मशानभूमी इ. कामे मंजूर असून लवकरच सदर कामे शासन पातळीवर पूर्ण होतील. ९.गावपातळीवर वर्षातून कमीत कमी चार वेळा ग्रामसभा घेतली जाते. ग्रामसभेमार्फत गाव विकासाच्या योजनांची माहिती दिली जाते. विकासकामे व लाभार्थी निवड केली जाते.

1 टिप्पणी:

कांबरे बु ||

पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हा सह्याद्री पर्वतरांगामधे येतो. भोर हा निरा नदीच्या काठावर वसलेला छोटासा तालुका. या तालुक्याच्या ठिकाणापासून ३२...