गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

कांबरे बु ||

पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हा सह्याद्री पर्वतरांगामधे येतो. भोर हा निरा नदीच्या काठावर वसलेला छोटासा तालुका. या तालुक्याच्या ठिकाणापासून ३२ कि.मी. अंतरावर पश्चिम दिशेला वेळवंडी नदीच्या काठावर कांबरे हे गाव वसले आहे. कांबरे हे तसं छोटसं गाव, पण या गावाला एका बाजूला वेळवंडी नदी आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री डोंगररांगा यामुळे खूपच सुंदर असं निसर्गवैभव लाभलं आहे. कांबरे हे गाव निसर्गाच्या कुशीत वसले आहे. गावाच्या दक्षिण बाजूस वेळवंडी नदी वाहत आहे. या नदीमध्ये एक प्राचीन शिवमंदिर असून हे मंदिर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे ते मंदिर कांबरेश्वर या नावाने ओळखले जाते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते पांडवकालीन असून पांडवांनी बांधले आहे, अशी आख्यायिका आहे. म्हणजे हे मंदिर किती प्राचीन आहे याची आपल्याला कल्पना येते. “कांबरेश्वराचा हर हर महादेव” या गजरात कांबरेश्वराचा आशिर्वाद घेऊन येथील शेतकरी आपला शेतीचा वारसा जपत आहेत. या संकेतस्थळाच्या निमित्ताने हा ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्याचा एक अल्पसा प्रयत्न करत आहे. कांबरे या गावाची किर्ती आणि प्रगतीकडे चाललेली वाटचाल या सर्व गोष्टींची यशोगाथा फक्त ठराविक जिल्ह्यापर्यंत नव्हे अगदी सीमेपर्यंत सुध्दा मर्यादित न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात जावी आणि “कांबरेश्वराचा हरहर महादेव” या नादाने अवघे विश्वच नादमय व्हावे यासाठी हा या वेबसाईट माध्यमातून केलेला माहितीसंचय आहे. शेती, क्रीडा, शिक्षण असलेल्या माहितीचा संचय आणि पुरावे म्हणून तयार झालेली वेबसाईट म्हणजे www.kambarebk.com की ज्याद्वारे एकाच क्लिक मध्ये कांबरे बु. गावाची घोडदौड अगदी सहज वाचता येईल. तर विचार काय करताय ? इंटरनेट वर जा आणि www.kambarebk.com या वेबसाईट वर कांबरे बु. गाव अगदी कधीही, कुठेही, केव्हाही पहा. आणि जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यास मदत करा ..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कांबरे बु ||

पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हा सह्याद्री पर्वतरांगामधे येतो. भोर हा निरा नदीच्या काठावर वसलेला छोटासा तालुका. या तालुक्याच्या ठिकाणापासून ३२...